Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe
वैकुंठ हे भगवान विष्णूंचे म्हणजेच परमेश्वर श्रीकृष्णांचे आध्यात्मिक स्थान किंवा निवासस्थान आहे. हे असे स्थान आहे जिथे जीव शाश्वत आनंद अनुभवतो. याउलट, भौतिक जगात, जिथे सध्या आपण आहोत, तिथे जीवाला जन्म, मृत्यू, जरा, आणि व्याधीच्या चक्रात अडकून राहावे लागते हुशार व्यक्तीला भौतिक जगाबद्दल आणि स्वतःच्या मूळ अस्तित्वाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. जर तुम्ही ती हुशार व्यक्ती असाल आणि तुम्हाला या न संपणाऱ्या जन्म-मृत्यू-जरा-व्याधीच्या चक्रातून सहज, सोप्या मार्गाने मुक्ती मिळवायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा आज आपण संत तुकाराम महाराजांचा तो अभंग पाहणार आहोत, जिथे महाराजांनी वैकुंठप्राप्तीचा सहज सोपा मार्ग सांगितला आहे. हा अभंग त्या वेळेचा आहे, जेव्हा तुकाराम महाराज