आम्ही जातो आपुल्या गावा – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

वैकुंठ हे भगवान विष्णूंचे म्हणजेच परमेश्वर श्रीकृष्णांचे आध्यात्मिक स्थान किंवा निवासस्थान आहे. हे असे स्थान आहे जिथे जीव शाश्वत आनंद अनुभवतो. याउलट, भौतिक जगात, जिथे सध्या आपण आहोत, तिथे जीवाला जन्म, मृत्यू, जरा, आणि व्याधीच्या चक्रात अडकून राहावे लागते हुशार व्यक्तीला भौतिक जगाबद्दल आणि स्वतःच्या मूळ अस्तित्वाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. जर तुम्ही ती हुशार व्यक्ती असाल आणि तुम्हाला या न संपणाऱ्या जन्म-मृत्यू-जरा-व्याधीच्या चक्रातून सहज, सोप्या मार्गाने मुक्ती मिळवायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा आज आपण संत तुकाराम महाराजांचा तो अभंग पाहणार आहोत, जिथे महाराजांनी वैकुंठप्राप्तीचा सहज सोपा मार्ग सांगितला आहे. हा अभंग त्या वेळेचा आहे, जेव्हा तुकाराम महाराज

0

कन्या सासुर्‍यासि जाये – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

एखाद्या व्यक्ती कितीही साधना करत असेल, नानाविध यज्ञ करत असेल, पण जर ती व्यक्ती स्वतःचा भगवंतापासून दुरावा अनुभवत नाही तोपर्यंत त्यास खरा भक्त समजता येणार नाही. संत तुकाराम महाराज हे भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठलाचे विशुद्ध भक्त होते, त्यांच्या काही अभंगात त्यांची भगवंतभेटीची असणारी तळमळ किंवा ओढ दिसून येते, आज जो अभंग आपण पाहणार आहोत त्यात संत तुकारामांचे भगवंतांप्रती असलेले उच्चकोटीचे प्रेम दिसून येते.  कन्या सासुर्‍यासि जाये ।मागें परतोनी पाहे ॥१॥तैसें जालें माझ्या जिवा ।केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥चुकलिया माये ।बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥जीवना वेगळी मासोळी ।तैसा तुका म्हणे तळमळी ॥३॥ संत तुकारामांच्या काळी म्हणजेच १७ व्या शतकात मुलींची लहान वयामध्येच

0

लागोनियां पायां विनवितों तुम्हाला – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

संत तुकारामांनी हरिभक्ति आणि हरिनामाचे श्रेष्ठत्व याविषयी अनेक अभंग रचले आहेत, त्यातील एक अभंग आज आपण पाहणार आहोत. लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥ संत तुकाराम महाराज अत्यंत आदरपूर्वक आपणास विनवणी करतात की आपण अत्यंत आनंदाने व हर्षोल्लासाने हरिकीर्तन करावे हाताने टाळी वाजवत मुखी परमेश्वराचे नाम घ्यावे. महाराज म्हणतात – तुम्ही विठ्ठल विठ्ठल वेळो वेळा म्हणा कारण हा सुख

0

क्षणक्षणा हाची करावा विचार – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

आपणास दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे आणि याचा उपयोग करून आपण या भौतिक अशाश्वत जगातून शाश्वत अशा अध्यात्मिक लोकांत प्रवेश करू शकतो.  संत तुकाराम महाराज म्हणतात –  क्षणक्षणा हाची करावा विचार । तरावया पार भव सिंधु ।।१।।नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।।२।।संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची ।।३।।तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो ।।४।। अभंगाच्या पहिल्या चरणात संत तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याने भवसिंधु म्हणजेच संसार रुपी सागरातून बाहेर पडण्याचा वेळोवेळी विचार केला पाहिजे कारण हा संसार किंवा मृत्यूलोक हा दुःख देणारा आहे आणि या भौतिक जगांत आपण जन्म-मृत्यू-जरा-व्याधीच्या चक्रात

0

आतां तरी पुढें हाचि उपदेश – संत तुकाराम


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

आपणास दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे आणि या मनुष्य जन्माचा उपयोग करून आपण शाश्वत भगवतधामाची म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती करू शकतो. आज जो अभंग आपण पाहणार आहोत त्यामध्ये संत तुकाराम महाराज मनुष्य जन्माचा उपयोग भक्तीमध्ये कसा करावा किंवा या अनमोल आयुष्याचा नाश न करण्याबद्दलचे उपदेश करतात.   महाराज पुढीलप्रमाणे उपदेश करतात –  आतां तरी पुढें हाचि उपदेश ।नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥सकळांच्या पायां माझें दंडवत ।आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥हित तें करावे देवाचें चिंतन ।करूनियां मन एकविध ॥२॥तुका म्हणे लाभ होय तो व्यापार ।करा काय फार शिकवावें ॥३॥ हितोपदेशाच्या एका श्लोकात म्हटले आहे –  आहार निद्रा भय मैथुनं चसामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ।धर्मो हि

0

आम्ही तेणे सुखी – छ. शिवाजी महाराज आणि संत तुकारामांची भेट


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगांतून त्यांचे भगवंतांविषयी असलेले प्रेम स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी त्यांच्या अभंगातून लोकांना समजेल अशा भाषेत अध्यात्म सोपं केलं. आपण हे एक शरीर नसून एक आत्मा आहोत आणि भगवंताची सेवा करणे हे आपले मूळ कर्तव्य आहे, असे त्यांनी शिकवले. मनुष्याने शरीराभोवतीच्या मोहात न अडकता या दुर्मिळ मानव जन्माचा उपयोग भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी केला पाहिजे, आणि हे साध्य करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी संन्यास आश्रम स्वीकारण्याची गरज नाही. तुकाराम महाराजांनी दाखवून दिलं की गृहस्थ असतानाही, गृहस्थाश्रमात राहून आपण भगवंताची उत्तम भक्ती करू शकतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून समाजाला असे अनेक उपदेश

0